Administration & Personnelप्रशासन आणि कर्मचारी

The Administration Branch manages work related to Human Resource Development, Establishment, General Administration, and Stores. It ensures smooth functioning of MMB’s internal processes and supports all departments in administrative matters. मानव संसाधन विकास, स्थापनाविषयक कामकाज, सामान्य प्रशासन व साठा विभागाशी संबंधित कामकाज ही प्रशासकीय शाखेची प्रमुख जबाबदारी आहे. या शाखेमार्फत मंडळातील अंतर्गत कामकाज सुरळीत पार पडते व सर्व विभागांना प्रशासकीय बाबतीत सहाय्य केले जाते.

The Senior Administrative Officer functions as the Head of the Administration Branch, under the overall supervision of the Chief Executive Officer, MMB.वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हे प्रशासकीय शाखेचे प्रमुख असून ते मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या सर्वांगीण देखरेखीखाली कार्यरत असतात.

The Establishment Section oversees the entire employee lifecycle from recruitment to retirement, including:स्थापना विभागामार्फत कर्मचारी सेवाकाळातील सर्व बाबी हाताळल्या जातात, जसे की:

  • Recruitment and promotionsनियुक्ती व पदोन्नती
  • Service record maintenanceसेवावहिनी नोंदीचे संगोपन
  • Grievance redressalतक्रार निवारण
  • Transfers and postingsबदली व नियुक्त्या
  • Contractual appointmentsकरारनिहाय नियुक्त्या
  • Pension, retirement, and related benefitsनिवृत्ती, पेन्शन व संबंधित लाभ

Appointments in MMB are made through multiple modes:नियुक्त्या पुढील प्रकारे केल्या जातात:

  • Direct Recruitment to key posts.महत्वाच्या पदांवर थेट भरती.
  • Promotions, based on eligibility and seniority.पात्रता व ज्येष्ठतेनुसार पदोन्नती.
  • Deputation, where staff are taken from Government or Semi-Government departments (e.g., PWD, Town Planning, and other agencies). प्रतिनियुक्तीवर शासन/अर्धशासकीय विभागांतून कर्मचारी घेणे (उदा. सार्वजनिक बांधकाम विभाग, नगररचना विभाग इ.)
  • Contractual Appointments, for retired or experienced professionals required for specialized infrastructure projects. करारनिहाय नियुक्त्या (निवृत्त अथवा अनुभवी तज्ञ व्यक्तींना प्रकल्पांच्या गरजेनुसार)

Service Entry Rules are the official legal framework that defines eligibility, recruitment process, and service conditions for posts under the Government and its organizations, including MMB.सेवा प्रविष्ट नियम म्हणजे शासकीय व त्याअंतर्गत संस्थांमधील पदांसाठी पात्रता, भरती प्रक्रिया व सेवा अटी निश्चित करणारा विधिसंमत आराखडा.

No. During probation, training and service assessment are mandatory, and therefore earned/medical leave is generally not granted.नाही. प्रोबेशन कालावधीत प्रशिक्षण व सेवामूल्यांकन अनिवार्य असते, त्यामुळे अर्जित/वैद्यकीय रजा साधारणतः मंजूर केली जात नाही.

Employees and officers undergo capacity building and skill development training through:प्रशिक्षण पुढील प्रकारे दिले जाते:

  • YASHADA, Government of Maharashtra’s training institute.यशदा, महाराष्ट्र शासनाचे प्रशिक्षण संस्था
  • Other recognized training institutes across India, as required.भारतातील इतर मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था
  • In-house workshops and specialized programmes related to maritime administration and engineering.मंडळामार्फत आयोजित कार्यशाळा व सागरी प्रशासन व अभियांत्रिकीसंबंधी विशेष कार्यक्रम

Yes. Eligible employees are considered for promotions based on performance, seniority, and service rules. Training and development programmes are also provided to enhance skills for higher responsibilities.होय. पात्रता, कार्यक्षमता व ज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाते. उच्च पदांसाठी आवश्यक कौशल्यविकास व प्रशिक्षण कार्यक्रम देखील दिले जातात.

The Establishment Section addresses employee grievances through a formal redressal mechanism, ensuring fairness, transparency, and compliance with government service rules.स्थापना विभागामार्फत पारदर्शक व न्याय्य पद्धतीने शासनाच्या नियमांचे पालन करून तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत आहे.

Based on expertise and project requirements, retired professionals with relevant experience may be re-engaged on a contractual basis for a fixed tenure.होय. प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार संबंधित अनुभव असलेल्या निवृत्त तज्ञांना ठराविक कालावधीसाठी करारनिहाय पुन्हा नियुक्त केले जाऊ शकते.

The Stores Section manages procurement, inventory, and supply of office and field materials, ensuring timely availability for projects and day-to-day operations.साठा विभागामार्फत खरेदी, साठा व कार्यालयीन व मैदानी साहित्याचा पुरवठा यांचे व्यवस्थापन केले जाते.

Yes. Administration looks after employee welfare, workplace facilities, leaves, service benefits, and other support measures as per government norms.होय. प्रशासकीय विभागाकडून कर्मचारी कल्याण, कार्यस्थळावरील सुविधा, रजा, सेवा लाभ इत्यादी शासनमान्य सोयी पुरवल्या जातात.

Yes. Service records, payroll, leave management, and correspondence are being increasingly digitized for efficiency, transparency, and accountability.होय. सेवा नोंदी, वेतननिर्धारण, रजा व्यवस्थापन व पत्रव्यवहार या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने डिजिटल पद्धतीने केल्या जात आहेत.

Transfers and postings are made in line with service requirements, administrative needs, and government rules.सेवेची आवश्यकता, प्रशासकीय गरज व शासन नियमांनुसार बदली व नियुक्त्या केल्या जातात.

Recruitment is carried out strictly as per Government of Maharashtra rules, through open advertisement, selection committees, and merit-based evaluation. शासन नियमांनुसार खुल्या जाहिरातीद्वारे, निवड समित्यांच्या मार्फत व गुणवत्तेवर आधारित पद्धतीने नियुक्त्या केल्या जातात.

Yes, subject to project needs and availability, students in maritime, engineering, or management fields may be offered internship or training opportunities. होय. प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार सागरी, अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण संधी दिल्या जाऊ शकतात.

The branch provides administrative, staffing, and logistical support to Engineering, Accounts, Traffic, and Marine Departments, enabling them to function effectively. अभियांत्रिकी, लेखा, वाहतूक व सागरी विभागांना प्रशासकीय, कर्मचारी व लॉजिस्टिक सहाय्य पुरवून त्यांच्या कार्यक्षमता वाढविण्यात मदत केली जाते.

The Establishment Branch maintains strict adherence to state government HR policies, reservation norms, and service regulations, ensuring compliance at all stages. स्थापना विभाग राज्य शासनाच्या एच.आर. धोरणे, आरक्षण नियम व सेवा नियमांचे काटेकोर पालन करते.

Yes. Regular performance appraisals are conducted to assess efficiency, training needs, and suitability for higher responsibilities. होय. नियमित कार्यक्षमता मूल्यमापनाद्वारे कर्मचार्‍यांची कार्यदक्षता, प्रशिक्षणाची गरज व उच्च पदांसाठी पात्रता तपासली जाते.

Contractual staff are appointed on fixed terms and are entitled to benefits as specified in their contracts, which may differ from permanent employee entitlements. करारनिहाय कर्मचाऱ्यांना त्यांच्याशी केलेल्या करारामध्ये नमूद केलेल्या लाभांनुसार सुविधा दिल्या जातात. हे लाभ कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांपेक्षा वेगळे असू शकतात.